महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात येण्यापुर्वी ग्रामिण भागाच्या कामकाजासाठी लोकल बोर्ड ही संस्था काम पाहत होती. महाराष्ट्रामध्ये दि. ०१ में, १९६० या शुभदिनी तत्कालीन पंतप्रधान मा.पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली व तत्कालीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा परिषदेची स्थापना दि. ०२ में १९६२ रोजी झाली आहे. मा.अध्यक्ष व मा. उपाध्यक्ष व पदाधिकारी यांची दि. १२ ऑगस्ट १९६२ रोजी निवड होऊन जिल्हा परिषद अस्तित्वात आली.
महाराष्ट्रातील ग्रामिण भागाचे सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय पद्धतीची लोकनियुक्त प्रशासकिय संस्था कायद्याने अस्तित्वात आली. त्रिस्तरीय म्हणजे गावपातळीवर ग्रामपंचायत अशी संस्था माहाराष्ट्रभर अस्तित्वात आली. या संस्थेचे काम नियमानुसार होण्यासाठी विधानसभेत कायदा करण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कामकाज जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ व ग्रामपंचीयतीचे कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये चालते.